S M L

विकृत डॉक्टर ताब्यात, तरुणीचं मोबाईलद्वारे चोरून करायचा चित्रिकरण

Sachin Salve | Updated On: Jan 10, 2016 03:49 PM IST

विकृत डॉक्टर ताब्यात, तरुणीचं मोबाईलद्वारे चोरून करायचा चित्रिकरण

10 जानेवारी : कोल्हापूर जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडलीये. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाच्या आवारातील वसतिगृहात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीचं मोबाईलवर चोरुन चित्रिकरण करण्याची अश्लील घटना घडलीये. विशेष म्हणजे हे कृत्य एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरनेच केलंय.

या विकृत डॉक्टराने त्याचा मोबाईल संबंधित तरुणीच्या बेडरुममधील खिडकीजवळ लपवून ठेवला होता. या प्रकरणी संबंधित प्रशिक्षणार्थी डॉक्टरने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनंतर पोलिसांनी 31 वर्षीय आरोपी पनीकुमार किरण कोटा या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. डॉक्टाराच्या अशा विकृत प्रकारामुळे रुग्णालयाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2016 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close