S M L

गुलाम अलींचा मुंबई दौरा, शिवसेना विरोध करणार ?

Sachin Salve | Updated On: Jan 11, 2016 09:09 AM IST

Gulam ali and shivsena11 जानेवारी : येत्या 29 जानेवारी रोजी गझल शहेनशहा गुलाम अली मुंबईत असण्याची शक्यता आहे. 'घरवापसी' या चित्रपटाचं म्युझिक लाँच होणार आहे, आणि यासाठी गुलाम अली उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे.

माजी टीव्ही अँकर सुहेब इल्यासी यांनी हा चित्रपट काढलाय. गेल्या वर्षी गुलाम अलींच्या मुंबई दौर्‍यावरून मोठा वाद झाला होता. गुलाम अली यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होताय या कार्यक्रमाला शिवसेनेनं विरोध केला होता.

आता यावेळी अली जर मुंबईत आले तर काय होतं, ते पाहण्याचं ठरणार आहे. मध्यंतरी पाकिस्तानी गायक अदनाम सामीने भारतीय नागरिकत्व मिळवलं आणि तो कायमचा मुंबईकर झाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2016 09:09 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close