S M L

सबनीसांचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, मुख्यमंत्री जाणार की नाही ?

Sachin Salve | Updated On: Jan 11, 2016 09:47 AM IST

सबनीसांचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, मुख्यमंत्री जाणार की नाही ?

11 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी भाषेत टीका करुन भाजप कार्यकर्त्यांचा रोष ओढावून घेणारे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या विरोधातला वाद अजूनही शमलेला नाही. आता सबनीस यांनी संमेलनाध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संमेलनासाठी निमंत्रण दिलंय.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या वादाला दुर्लक्ष करून मी त्यांना निमंत्रण देतोय असं सबनीस म्हणाले. तसंच संमेलनासाठी आपण सव्वाशे पानांचं भाषण तयार केल्याचंही सबनीस यांनी सांगितलंय. आतापर्यंतच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी बोलणं टाळलंय. सबनीसांच्या टीकेवर भाजपने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलीये. एवढंच नाहीतर साहित्यक्षेत्रातूनही नाराजीचा सूर उमटलाय. आता सबनीस यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलंय. आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी संमेलनाला आवर्जून हजेरी लावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री संमेलनाला हजर राहता की नाही हे पाहण्याचं ठरणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2016 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close