S M L

नाशिकच्या बालसुधारगृहातून 12 मुलं पळाली

Sachin Salve | Updated On: Jan 11, 2016 12:25 PM IST

नाशिकच्या बालसुधारगृहातून 12 मुलं पळाली

11 जानेवारी : नाशिकच्या किशोरसुधारगृहातून 12 मुलं पळाली. आज पहाटे ही घटना घडली आहे. मायको सर्कल सुधारगृहातून या 12 मुलांनी पळ काढलाय. यातल्या चार मुलांनी याधीही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

पलायन केलेल्या मुलांपैकी 9 मुलं पुण्याची, 2 सातार्‍याची, तर 1 जण मुंबईचा आहे. या मुलांना दरोडा आणि खुनाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा सुनावण्यात आली आहे. 16 फूट भिंत ओलांडून या मुलांनी पळ काढलाय. या मुलांनी भिंत ओलांडायला चादरींचा वापर केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2016 12:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close