S M L

ह्रतिकने स्वत:लाचं दिलं बर्थ गिफ्ट, घेतली आलिशान रोल्स रॉईस कार !

Sachin Salve | Updated On: Jan 11, 2016 01:36 PM IST

ह्रतिकने स्वत:लाचं दिलं बर्थ गिफ्ट, घेतली आलिशान रोल्स रॉईस कार !

11 जानेवारी : आपला वाढदिवस हा वर्षातला सर्वात मोठा सणच...त्यामुळे प्रत्येक जण यादगार असा वाढदिवस साजरा करत असतात. अभिनेता ह्रतिक रोशननेही आपला वाढदिवस खासच साजरा केला.

काल रविवारी ह्रतिकचा वाढदिवस होता, आणि त्यानं स्वतःला एक मोठं गिफ्ट दिलंय. हृतिकनं वाढदिवसाच्या निमित्ताने नवी रोल्स रॉईस गाडी घेतली आहे. लांबच्या लांब आणि आलिशान अशी ही गाडी घेऊन हृतिक बर्थडे पार्टीला गेला होता.

त्याला आधीपासून गाड्यांचा खूप छंद आहे. त्याच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि ऑडी या गाड्या आधीच आहेत. त्या गाड्यांसारखाच या नव्या गाडीचाही नंबर 1001 आहे. 10 जानेवारीला त्याचा वाढदिवस असतो, म्हणून त्याच्या गाड्यांचा नंबर 1001 असा असतो.

अशी आहे आलिशान रोल्स रॉईस गाडी

- किंमत - 4.5 ते 8 कोटी

- मुख्य इंजिनिअरचं नाव इंजिनवर कोरलेलं असतं

- गाडीतलं लेदरचं काम हातानं केलेलं

- गाडीचं इंटिरिअर तुमच्या मनासारखं करून मिळतं

- इंटिरिअरसाठी उच्च प्रतीच्या लाकडाचा वापर

- चारही सीटस्‌च्या अवतीभोवती वेगवेगळं तापमान ठेवता येतं

- सीटमध्ये मसाजर

- मागच्या सीटस्‌साठी टीव्ही स्क्रीन्स

- सीटस्‌जवळ छोटं फ्रीज असतं

- इंधन क्षमता : 100 लीटर

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2016 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close