S M L

खुशखबर! म्हाडाच्या 4275 घरांची 24 फेब्रुवारीला लॉटरी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 11, 2016 03:22 PM IST

MHADA121

11 जानेवारी : मुंबईत घरं घेणार्‍यांसाठी खुशखबर! म्हाडा कोकण मंडळाची येत्या 24 फेब्रुवारीला लॉटरी निघणार आहे. तब्बल 4275 घरासाठी लॉटरी निघणार असून ठाणे, विरार, मीरारोड आणि वेंगुर्ल्यात मोठ्या संख्येनं घर उभारण्यात आली आहेत.

12 जानेवारीला याबाबत जाहिरात प्रसिद्ध होईल. ऑनलाईन नोंदणी 13 जानेवारीला, तर अर्ज भरण्याची सुरुवात 15 जानेवारीला होणार असून ऑनलाईन नोंदणी अंतिम तारीख 7 फेब्रुवारी तर अर्ज दाखल अंतिम तारीख 9 फेब्रुवारी असणार आहे.

यामध्ये विरारमधल्या 3755 घरांचा तर घोडबंदर ठाणे-मीरारोड इथल्या 310 घरांचा समावेश असणार आहे. तसंच ठाण्यातील बाळकुमंबमधल्या 20, कावेसारमधल्या 164 घरं अल्प उत्त्पन्न गटातील असतील. त्यासोबत वेंगुर्लामध्ये 27 घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना घरांसाठी लॉटरीद्वारे आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2016 03:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close