S M L

पूर्ववैमनस्यातून शेजार्‍यानं दीड वर्षाच्या मुलाला कारखाली चिरडलं!

Samruddha Bhambure | Updated On: Jan 11, 2016 05:22 PM IST

पूर्ववैमनस्यातून शेजार्‍यानं दीड वर्षाच्या मुलाला कारखाली चिरडलं!

11 जानेवारी : पूर्ववैमनस्यातून शेजार्‍यानं दीड वर्षांच्या चिमुरड्याला गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना भिवंडीत उघडकीस आली. देवांग पाटील, असं या चिमुकल्याचं नाव होतं. त्याला मोटारीखाली चिरडणारा विश्वनाथ पाटील पसार झाला आहे.

देवांगचे वडील देवानंद पाटील आणि विश्वनाथ हुलावले हे ऐकमेकांचे शेजारी आहेत. या दोघांमध्ये गेल्या 15 वर्षांपासून घरातील सांडपाण्यावरून वाद आहे. याआधीही विश्वानाथ यानं या वादातून दयानंद यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही किरकोळ कारणावरून दोन्ही कुटुंबियांमध्ये कायम कुरबुरी सुरू होत्या. त्याचाच राग मनात धरून चिमुकला देवांग घरासमोर खेळत असल्याची संधी साधून विश्वनाथनं त्याच्या अंगावर गाडी घातली. देवांग गाडीखाली आल्याचं पाहून जवळच असलेली देवांगची काकी दर्शना आणि शेजारील द्वारकनाथ माळी यांनी मुलगा गाडीखाली आल्याची आरडाओरड केली. मात्र विश्वनाथ एवढ्यावरचं न थांबता त्याने देवांगच्या अंगावर उलट रिव्हर्स गाडी घेवून आणखीन एकदा त्याला चिरडले.

दरम्यान, भिवंडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी सुरूवातीला अपघाताची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीअंती आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2016 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close