S M L

चिमुरड्या देवांगला कारखाली चिरडणार्‍या हुलावलेला अटक

Sachin Salve | Updated On: Jan 12, 2016 01:35 PM IST

Bhiwandi Murder12 जानेवारी : भिवंडीत देवांग पाटील या चिमुरड्याला कारखाली चिरडणार्‍या आरोपी विश्वनाथ हुलावलेला पोलिसांनी अटक केली आहे. रात्री सव्वा वाजता पडघ्यामधून त्याला अटक झाली. आज त्याला भिवंडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्याच्यावर आधीत मनुष्यवधाच गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दीड वर्षाच्या देवांगच्या वडिलांशी भांडण असल्यामुळे विश्वनाथचा त्यांच्यावर राग होता. काही दिवसांपूर्वी त्याला देवांग घराबाहेर खेळताना दिसला, आणि या हैवानानं देवांगच्या अंगावर गाडी घातली. त्यात देवांगचा जागीच मृत्यू झाला.

भिंवडीत कोलीवलीत राहणार्‍या विश्वनाथ हुलावलेनं दीड वर्षाच्या देवांगच्या अंगावर गाडी घातली होती. यात चिमुरडा देवांग जागीच ठार झाला. विश्वनाथ हुलावलेच्या सूडबुद्धीचा शिकार झाला तो चिमुकला देवांग. चिमुकला देवांग घरासमोर खेळत असल्याची संधी साधून विश्वनाथनं देवांगवर गाडी घातली . देवांग गाडीखाली आला असताना जवळच असलेली देवांगची काकू दर्शना आणि शेजारी असलेले द्वारकनाथ माळी यांनी मुलगा गाडीखाली आल्याची ओरड केली. मात्र, विश्वनाथ याने देवांगच्या अंगावर गाडी उलट रिव्हर्स घेवून आणखीन त्याला चिरडले. यात देवांगच्या डोक्याची कवटी फुटून मेंदू बाहेर आल्याने देवांग जागीच ठार झालाय.

15 वर्षांपूर्वी कोलीवली गावात दयानंद पाटील आणि शेजारी राहणारा विश्वनाथ जनार्दन हुलावले यांच्या कुटुंबात सांडपाण्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातूनच विश्वानाथ यानं याआधीही दयानंद यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. विश्वनाथच्या मनात राग खदखदतच होता आणि याच रागातून त्यानं निरागस चिमुरडा देवागंचा बळी घेतला. आणि फरार झाला. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत 24 तासांत आरोपी हुलावलेच्या मुसक्या आवळल्या.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2016 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close