S M L

उमरेड कारंडला अभयारण्यातल्या जिप्सी चालक आणि गाईडचं निलंबन

Samruddha Bhambure | Updated On: Jan 12, 2016 05:38 PM IST

उमरेड कारंडला अभयारण्यातल्या जिप्सी चालक आणि गाईडचं निलंबन

12 जानेवारी : उमरेड कारंडला अभयारण्यातल्या एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. पर्यंटकांच्या जिप्सी गाडीजवळ एक वाघ आला होता, आणि खूप वेळ तो पर्यटकांजवळ उभा होता. यासाठी वनविभागानं आता गाईड आणि जिप्सी चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे. व्याघ्रदर्शनाचे नियम मोडणे आणि पर्यटकांचा जीव धोक्यात घालण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या एका परिवारासोबत अभयारण्याची सफर करताना दोन वाघ जिप्सीच्या अगदी जवळ आले होते. त्याचं चित्रिकरण या कुटुंबानं आपल्या मोबाईलमध्ये केलं. पण ही घटना हे नियमांचं उल्लंघन असल्याचा दावा करत वनविभागानं या दोघांनाही निलंबित केलं आहे.

निर्धारित काळापेक्षा जास्त म्हणजे 20 ते 25 मिनीटे गाडी थांबवणं, दोन वाहनांमधील अंतर किमान 50 मीटर असायला हवं, ते नव्हतं, तसंच वाघ जेव्हा जिप्सीजवळ आला, तेव्हा ड्रायव्हर जागेवर नव्हता, या आरोपांखाली त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2016 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close