S M L

राहुल गांधींच्या दौर्‍यावरून मुंबई काँग्रेसच्या दोन गटात राडा

Samruddha Bhambure | Updated On: Jan 12, 2016 07:13 PM IST

राहुल गांधींच्या दौर्‍यावरून मुंबई काँग्रेसच्या दोन गटात राडा

12 जानेवारी : मुंबई काँग्रेसच्या ऑफिसमध्ये आज माजी मंत्री नसिम खान आणि आमदार अस्लम शेख या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. इतकचं नाही तर हे भांडण थोपवण्यासाठी पुढे आलेले आमदार भाई जगताप यांनाही हाणामारीचा फटका बसला. राहुल गांधी यांच्या दौर्‍याचा मार्ग काय असावा यावरुन हा वाद झाला. या राड्यामुळे मुंबई काँग्रेसमधली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या 15 आणि 16 जानेवारीला मुंबई दौर्‍यावर आहेत. राहुल यांच्या मुंबई दौर्‍यासंदर्भात फोर्टमधील कार्यालयात बैठक सुरु होती. दौरा आमच्याच भागात असावा असा या दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र या बैठकीतच आमदार अस्लम शेख आणि नसिम खान यांचे समर्थक एकमेकांना भिडले.

दरम्यान, असं कोणतेही वाद आमच्यात झाले नाहीत असं नसीम खान यांनी म्हटलंय तर वाद होतच असतात अशी सारवासारव अस्लम शेख यांनी केली आहे. याआधीही कृपाशंकर सिंह, संजय निरुपम, गुरुदास कामत यांच्यात झालेल्या वादांमुळे काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस समोर आली होती.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2016 07:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close