S M L

'ते' महात्मा फुलेंचे वारसदारच नाहीत!

Samruddha Bhambure | Updated On: Jan 12, 2016 07:38 PM IST

'ते' महात्मा फुलेंचे वारसदारच नाहीत!

12 जानेवारी : महात्मा फुले यांचे वारसदार म्हणून संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन पथसंचलन करून संघ ही वैश्विक संघटना आहे असा सांगणार्‍यांचा आणि संघाचा ढोंगीपणा आता उघड झाला आहे. महात्मा फुले यांचे वारस असल्याचं सांगणारे नितीन फुले आणि दत्तात्रय फुले हे प्रत्यक्षात महात्मा फुले यांचे भाऊ राजाराम फुले यांचे वारस असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आधी आंबेडकरांना कब्जात घेणारा संघ महात्मा फुलेंनाही बुद्धिभेद करून ताब्यात घेत असल्याची टीका होत आहे.

पुण्यातल्या शिवशक्ती संगमात महात्मा फुले यांचे खापर पणतू दत्तात्रय फुले आणि नितीन फुले यांनी सहभाग घेतला आणि या दोघांनी पथसंचलनही केलं होतं. संघ बहुजनवादी होतोय हे दाखवण्यासाठी संघानं जाणीवपूर्वक ही बाब सगळ्यांसमोर आणली. संघ यातून महात्मा फुलेंच्या विचारांवर गदा आणण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप सत्यशोधक कार्यकर्ते करताहेत. तर दुसरीकडे दत्तात्रय फुले यांना संघाच्या समरसतेचे विचार पटताना दिसत आहेत.

महात्मा फुलेंनी आपल्या मृत्युपत्रात त्यांच्या वंशजांबद्दलच्या सगळ्या गोष्टी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्या मृत्युपत्रानुसार आताच्या कथित वंशजांच्या पूर्वजांबद्दलचा कुठलाही संदर्भ सापडत नाही. महात्मा फुलेंचे दत्तकपुत्र यशवंत यांच्या वंशावळीतून पुढे आलेल्या नीता होले म्हणताहेत की, त्याच खर्‍या महात्मा फुलेंच्या वारसदार आहेत.

बहुजनवादाचं लेबल स्वत:ला लावून घेणार्‍या संघानं आता एक वाद निर्माण करून ठेवला आहे. त्यामुळे महात्मा फुलेंचे नक्की वारसदार कोण, हाच प्रश्न आता उपस्थित होतोय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 12, 2016 07:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close