S M L

छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर ?

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2016 01:16 PM IST

Chagan-Bhujbal13 जानेवारी : माजी बांधकाम मंत्री आणि एकेकाळी शिवसेनेत असणारे राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं वृत्त आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादीतले अनेक नेते सेनेत जाण्यास इच्छुक असल्याचं समजतंय. पण भुजबळ किंवा सेना यांच्याकडून अजून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

पण जर असं झालं, तर राष्ट्रवादी आणि भाजपला मोठं खिंडार पडणार एवढं नक्की. कारण भुजबळांची सध्या एसीबीची चौकशी सुरू आहे, आणि जर भुजबळ सेनेत गेले, तर चौकशीचा वेग कमी करण्याचं दडपण मुख्यमंत्र्यांवर येऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे.

भुजबळांची सध्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात चौकशी सुरू आहे, त्यादरम्यान राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहत नाहीय, अशी भुजबळांची भावना आहे. दुसरं म्हणजे अजित पवार आणि भुजबळ यांचे संबंध आधीपासून ताणलेले आहेत. याआधीही विधानसभा निवडणुकीच्या वेळी असा बातम्या आल्या होत्या. पण त्यावेळी भुजबळांनी त्याचं खंडन केलं होतं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2016 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close