S M L

साहित्य महामंडळाच्या कारभाराविरोधात साहित्यिक पोलीस ठाण्यात

Samruddha Bhambure | Updated On: Jan 13, 2016 09:46 PM IST

साहित्य महामंडळाच्या कारभाराविरोधात साहित्यिक पोलीस ठाण्यात

13 जानेवारी : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कारभाराविरोधात साहित्यिक आणि प्रकाशक एकत्र आले असून, त्यांनी बुधवारी मुंबई पोलीस ठाण्यात निवडणूक चुकीच्या पद्धतीनं घेतल्याची तक्रार दाखल केली आहे. तसंच महामंडळाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी ही केली.

साहित्यिक विश्वास पाटील, राजन खान, महेश केळुस्कर, अशोक मुळे, मुरलीधर साठे, अरूण म्हात्रे, भारत सासणे 'अनुबंध' प्रकाशनचे अरविंद कुलकर्णी यांच्यासह इतर साहित्यिकांनी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, आणि साहित्य संमेलन मंडळाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सबनीस यांची निवड प्रक्रिया वैध पद्धतीने पार पडलेली नाही. त्यामध्ये अनेक त्रुटी असून, गैरप्रकारही झालं आहेत, असा आरोप साहित्यिकांनी केला आहे. सगळ्यांनी या निवडणुकीबद्दल माहितीच्या अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. पण ती त्यांना मिळाली नव्हती. काल त्यांच्या हाती काल मतपत्रिका लागल्यात. त्यावरून ही निवडणूक चुकीची असल्याचा आरोप करत हे साहित्यिक मैदानात उतरले आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2016 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close