S M L

'कॉमेडी नाईट्स..' मधील 'पलक'ची जामीनावर सुटका

Samruddha Bhambure | Updated On: Jan 13, 2016 10:15 PM IST

'कॉमेडी नाईट्स..' मधील 'पलक'ची जामीनावर सुटका

13 जानेवारी : 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोमध्ये 'पलक'ची भूमिका साकारणार्‍या किकू शारदाला डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्या 'एमएसजी 2'च्या एका सीनवर कॉमेडी ऍक्ट सादर केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं असून 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर किकू शारदाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.  दरम्यान, डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम यांनीही ट्विट करुन कीकूने माफी मागितल्यानंतर त्याला माफ केलं आहे.

डेरा प्रमुखाने केलेल्या ट्विटमध्ये काय?

ट्विटमध्ये म्हटलं आहे, 'मी ऑनलाइन गुरुकुलच्या शुटिंगमध्ये व्यस्त होतो. मला या प्रकरणाबाबत माहिती नव्हती, आताच याबद्दल समजले. मात्र किकूने त्याच्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे तर माझी त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.'

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2016 05:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close