S M L

भुजबळांना क्लीन चीट नाही, 'ते' पत्र अधिकार्‍यांसाठी होतं - राऊत

Sachin Salve | Updated On: Jan 14, 2016 02:09 PM IST

sanjay rautमुंबई - 14 जानेवारी : छगन भुजबळांना क्लीन चीट देणार मी कोण आहे, ते कोर्ट किंवा मुख्यमंत्री ठरवतील. मी फक्त सहा अधिकार्‍याचा नाहक बळी जाऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असा यू-टर्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतला. तसंच भुजबळांनी शिवसेनेत येण्यासाठी अजून अर्ज केलेला नाही आहे. आणि त्यांनी ते ज्या कंपनीत काम करतात तिथे राजीनामा दिल्याचंही माहीत नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नाहक लोकांचा बळी देऊ नये असा सल्ला दिला होता. परंतु, राऊतांच्या या पत्रामुळे छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. पण भुजबळांनी कालच हे वृत्त फेटाळून लावलं. आपण शिवसेनेत जाणार नाही असं स्पष्ट केलं. तर आज राऊतांनी आपल्या पत्रावरून यू-टर्न घेतलाय. छगन भुजबळांना क्लीन चीट मी देऊ शकत नाही. कोर्ट किंवा मुख्यमंत्रीच याबद्दल काय तो निर्णय घेतली. आपण फक्त अधिकार्‍यांचा नाहक बळी जाऊ नये यासाठी पत्र लिहिलं होतं असा खुलासाच राऊतांनी केला. तसंच भुजबळांनी शिवसेनेत येण्यासाठी अजून अर्ज केलेला नाही आहे. आणि त्यांनी ते ज्या कंपनीत काम करतात तिथे राजीनामा दिल्याचंही माहीत नाही. शिवसेनेत कुणाला घ्यायचे हा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतात असंही राऊत म्हणाले.

गुलाम अलींच्या कार्यक्रमाला विरोधच

मसूद अझरला ताब्यात घेऊन पाकिस्तान त्याला विश्रामगृहात ठेवलंय. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. शिवसेनेची पाकिस्तान विरोधाच्या भूमिकांवर ठाम आहे. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यावर सर्व भाजपचे नेते एकवटून विरोध करतात. मग देशभक्त शिवसेना पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडू यांच्या विरोध करते तर आम्हाला का विरोध होतो. ज्यांने संसदेवर हल्ला केला, मुंबईवर हल्ला केला. पठाणकोटवर हल्ला केला त्या देशांतल्या लोकांना का सन्मान दिला जातोय आणि पोलीस सुरक्षा दिली जातेय असं सांगत गुलाम अली यांच्या मुंबईत होणार्‍या कार्यक्रमाला आमचा विरोध आहे असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2016 01:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close