S M L

मालाडमध्ये नरबळी देण्याचा प्रकार उघड, एकाला अटक

Samruddha Bhambure | Updated On: Jan 14, 2016 04:09 PM IST

मालाडमध्ये नरबळी देण्याचा प्रकार उघड, एकाला अटक

मुंबई – 14 जानेवारी : अंधश्रद्धा विरोधी कायदा तयार होऊनही मुंबईतल्या मालाडमध्ये नरबळी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मालाड पूर्वमध्ये एका घरात आठ वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याची तयारी सुरू असताना शेजारच्यांच्या सतर्कतेमुळे मालाड पोलिसांंनी हा प्रयत्न उधळून लावला आहे.

मालाड इथल्या एका घरात चार ते पाच फूट खोल खड्डा करुन तिथे एका बालकाला पुरुन त्याचा नरबळी देण्याची तयारी केली जात असल्याचा संशय शेजारच्यांना आला होता. म्हणून त्यांनी घरात चालणार्‍या हालचालींचा अंदाज घेत तात्काळ पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर, या ठिकाणी त्यांना घरात केलेल्या पाच फूट खोल खड्‌ड्यात पुजेची सामग्री आढळून आली. तसंच एका महिलेसोबत मौलवी, एका आठ वर्षांच्या मुलाचा बळी देण्याची तयारीत होते.

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जातं आहे. या प्रकरणात एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात, आलं आहे. तर कोणावरही अद्यापपर्यंत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2016 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close