S M L

असिन-राहुलच्या लग्नाची गोष्ट, लग्नपत्रिका छापली सोन्याची !

Sachin Salve | Updated On: Jan 14, 2016 04:41 PM IST

असिन-राहुलच्या लग्नाची गोष्ट, लग्नपत्रिका छापली सोन्याची !

14 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सीईओ राहुल शर्मा यांच्या लग्नाची तारीख अखेर पक्की झाली आहे. 23 जानेवारीला दोघांही लग्नबेडीत अडकणार आहेत असं अक्षय कुमार ने टिवट् केलंय. विशेष म्हणजे असिन आणि राहुलची लग्न पत्रिका ही चर्चेचा विषय ठरली आहे. कारण त्यांची लग्नपत्रिका ही सोन्यात तयार केलेली.

नुकताच विवाहबध्द झालेल्या किक्रेटर हरभजन सिंगची लग्न पत्रिकाचं डिझाईन ज्यांनी केलं. त्यांनीच असिन आणि राहुलची लग्नपत्रिका बनवली आहे. या लग्न पत्रिकेच विशेष हे आहे की कार्डवर काळ्या रंगावर सोन्यानी इंग्रजीमध्ये ए.आर. म्हणजे असिन आणि राहुल असं लिहिलेलं आहे. सर्वात आधी अक्षयकुमारला लग्नपत्रिका दिली गेली. नतंर सोशल मीडियावर अक्षयने पत्रिकेचा आणि या दोघांचा फोटो शेअर केला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2016 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close