S M L

स्वतंत्र विदर्भाची मागणी करणार्‍या संघटनांच्या बैठकीत श्रीहरी अणेंची हजेरी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 14, 2016 09:10 PM IST

स्वतंत्र विदर्भाची मागणी करणार्‍या संघटनांच्या बैठकीत श्रीहरी अणेंची हजेरी

Aney123

14 जानेवारी : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी काम करणार्‍या संघटनांच्या बैठकीत राज्याचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे हजर असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भ जर स्वतंत्र झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही उरणार नाही' असं अणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आणे यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत.

भाजपचे नेते दत्ता मेघे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत श्रीहरी अणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

यापूर्वी स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही याचं उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे या मुद्यावर जनचाचणी घेण्यात यावी, असं वक्तव्य अणे यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेने अधिवेशनात गदारोळ माजवला होता. तसंच अणेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेने हक्कभंग प्रस्तावही आणला होता. तो वाद शमतो ना शमतो तोच विदर्भवाद्यांच्या बैठकीतच श्रीहरी अणे उपस्थीत झाल्याने अखंड महाराष्ट्रवाद्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2016 09:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close