S M L

'ऑस्कर 2016'ची नामांकनं जाहीर

Samruddha Bhambure | Updated On: Jan 14, 2016 09:38 PM IST

'ऑस्कर 2016'ची नामांकनं जाहीर

14 जानेवारी : गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स नंतर आता सगळ्यांना वेध लागलेत ते ऑस्कर्सचे. 28 फेब्रुवारीला ऑस्कर अवॉर्ड सोहळा पार पडणार आहे. अमेरिकेच्या बेव्हर्ली हिल्समध्ये आज ऑस्कर नामांकनं म्हणजेच नॉमिनेशन्स जाहीर करण्यात आली.

'मॅड मॅक्स: फ्युरी रोड'ला सर्वाधिक 10 विभागात नामांकनं मिळाली आहेत. तर बेस्ट ऍक्टर्सच्या स्पर्धेत तगडा मुकाबला असून मॅट डेमन, मायकल फॅसबेंडर सारख्या ऍक्टर्सचं आव्हान परतवत लिओनार्डो डिकॅप्रिओ आपलं पहिलं ऑस्कर पटकावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

मॅड मॅक्स, द मार्शन आणि द रेव्हेनंट सारख्या बड्या फिल्मसच्या जोडीला द डॅनिश गर्ल, स्टीव्ह जॉब्स, रूम सारख्या सिनेमांनाही नामांकनं मिळालं आहे. यंदा ऑस्कर्सचं 88 वं वर्षं असून या वर्षीच्या ऑस्कर्स सोहळ्याचा होस्ट कॉमेडिअन क्रिस रॉक असणार आहे.

 बेस्ट ऍक्टर (नामांकनं)

 • लिओनार्डो डिकॅप्रिओ (द रेव्हनंट)
 • मॅट डेमन (द मार्शन)
 • मायकल फॅसबेंडर (स्टीव्ह जॉब्स)
 • ब्रायन क्रॅनस्टन (ट्रंबो)
 • एडी रेडमेन (द डॅनिश गर्ल)

बेस्ट ऍक्ट्रेस (नामांकनं)

 • केट ब्लँचेट (कॅरल)
 • ब्री लार्सन (रूम)
 • जेनिफर लॉरेन्स (जॉय)
 • शार्लट रँपलिंग (45 इयर्स)
 • सिओशा रॉनन (ब्रुकलिन)

बेस्ट सिनेमा (नामांकनं)

 • द रेव्हनंट
 • द मार्शन
 • ब्रिज ऑफ स्पाईज्
 • मॅड मॅक्स : फ्युरी रोड
 • रूम
 • स्पॉटलाईट
 • द बिग शॉर्ट
 • ब्रुकलिन

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2016 09:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close