S M L

'तारक मेहता..'चा कलाकार विशाल ठक्कर 11 दिवसांपासून बेपत्ता

Sachin Salve | Updated On: Jan 15, 2016 09:55 AM IST

'तारक मेहता..'चा कलाकार विशाल ठक्कर 11 दिवसांपासून बेपत्ता

15 जानेवारी : सिनेसृष्टीतला सहाय्यक अभिनेता आणि टीव्ही सिरीयल 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करणारा विशाल ठक्कर हा 31 डिसेंबरपासूनच्या रात्रीपासून बेपत्ता आहे. त्याच्या वडिलांनी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना ठाणे घोडबंदर ते मीरा रोड या भागात घडली असल्यानं ठाणे पोलिसांकडे हे प्रकरण सोपवण्यात आलंय.

31 डिसेंबरच्या रात्री विशाल नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीसाठी अहमदाबादला गेला होता. येताना तो मीरा रोड-घोडबंदर रोडवरच्या फाउंटन हॉटेलमध्ये थांबला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची मैत्रीणही होती. तिनं दिलेल्या माहितीनुसार, विशाल आधी अंधेरीमध्ये त्याच्या

मित्राकडे जातो असं सांगून गेला होता. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. अजून त्याचा पत्ता लागलेला नाही. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी 2 पथकं तयार केली आहेत. त्याचं मोबाईलचं शेवटचं लोकेशन घोडबंदर दिसत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2016 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close