S M L

मुंबईचा महापौर काँग्रेसचाच हवा - राहुल गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 15, 2016 09:28 PM IST

rahul gandhi

मुंबई - 15 जानेवारी : मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा महापौर होणं गरजेचं असल्याचं आवाहन करत राहुल गांधी यांनी आज मुंबई महापालिका निवडणूकीच्या प्रचाराचा नाराळ फोडला. मुंबई पालिकेची निवडणूक सर्वांनी मिळून लढावी असं म्हणत राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत गटबाजीचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, अशा शब्दात मुंबईकरांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा देताना राहुल गांधींनी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना टोमणा मारण्याची संधी साधली.

राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर आले आहे. मालाडमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याचं दिसून आलं आहे.

गांधी यांनी स्मार्टसिटी योजनेवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. स्मार्ट सिटीची योजना जाहीर केली त्यावेळी मलाही ती आवडली होती. पण आता मुंबईसारख्या शहराला या योजनेतून वर्षांला 100 कोटी मिळणार आहेत. त्यातून हे शहर कसे स्मार्ट होणार, हा प्रश्नच आहे. सरकार स्टार्ट-अपची भाषा करते. पण देशात अनेक गरीब लोक आहेत. मात्र, सरकारने गरिबांकडे दुर्लक्ष केले आहे. गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रस कटीबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.

मोदींचे मार्केटींग चांगले आहे. ते भाषणेही चांगली ठोकतात, मात्र, भाषणाने मुंबई किंवा देश स्वच्छ होणार नाही, किंवा देशात बदलही घडणार नाही, असा सणसणीत टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लगावला. मंत्र्यांनी आणि नेत्यांनी हातात झाडू घेऊन एकदिवस सफाई केली म्हणून कोणतेही शहर साफ होणार नाही, असं सांगत त्यांनी मोदी सरकारच्या स्वच्छता अभियानावरही टीका केली. बदल घडविण्यासाठी सर्वांना बरोबर घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 15, 2016 06:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close