S M L

राहुल गांधींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

Sachin Salve | Updated On: Jan 16, 2016 01:17 PM IST

राहुल गांधींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

 

मुंबई - 16 जानेवारी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी मुंबईच्या दुसर्‍या दिवशी एनएम कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अनेक विषयांवर राहुल यांनी आपली मतं मांडली. आपल्या भाषणात राहुल यांनी मात्र राजकीय विषय टाळले. विकास, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर राहुल बोलले. पण प्रश्नोत्तराच्या वेळेत विद्यार्थ्यांनी राजकीय प्रश्न विचारलेच. जीएसटी विधेयकावर आमच्या 3 अटी आहेत. त्या सरकारनं मान्य कराव्यात आम्ही लगेच जीएसटीला पाठिंबा देऊ असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं. तसंच मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला होता, याची आठवणही राहुल यांनी करून दिली.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2016 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close