S M L

कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे होणार होते जिवंत बाळावर अंत्यसंस्कार

Sachin Salve | Updated On: Jan 16, 2016 08:19 PM IST

कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे होणार होते जिवंत बाळावर अंत्यसंस्कार

अकोला - 16 जानेवारी : अकोला सर्वोपचार रुग्णालयामध्ये एका मृत बालकाचा मृतदेह आप्तेष्टांच्या ताब्यात देण्याऐवजी दुसर्‍या एका महिलेची जिवंत मुलगी देण्यात आलीये. विशेष म्हणजे, मृत बालकाचे आप्तेष्ट जिवंत मुलीचाच आपला मुलगा समजून अंत्यसंस्कार करायला घेऊन गेले होते. सुदैवाने मुलीची हालचाल दिसून आल्याने पुढचा अनर्थ टळला.

सर्वोपचार रुग्णालय वेगवेळ्या घडामोडींनी नेहमीच चर्चेत राहते. शुक्रवारी बालकांची अदलाबदली करून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कळसच गाठला. 9 जानेवारी रोजी रिसोड तालुक्यातील शेलगावची प्रियंका प्रशांत वाघ ही प्रसुतीसाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाली. प्रियंकानं 10 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता एका

मुलाला जन्म दिला. परंतु मुलाची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला प्री-मॅच्युअर बेबी युनिटमध्ये दाखल केले. तीन, चार दिवस उपचार केल्यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि बुधवारी मुलाचा मृत्यू झाला. पण याची माहिती प्रियंकाला तिच्या पतीने दिली नाही. प्री-मॅच्युअर बेबी युनिटमधील मुलाला रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी कापडामध्ये गुंडाळून प्रियंकाच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या बाळावर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक शेलगावला रुग्णवाहिकेने निघाले. काही नातेवाइकांनी मुलाचा चेहरा पाहण्यासाठी मुलाच्या तोंडावरील कापड बाजूला केल्यावर त्यांना डोळय़ांच्या पापण्याची हालचाल होत असल्याचं दिसून आलं. त्यांनी लगेच सर्वोपचार रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा त्यांच्या ताब्यात मृत मुलाऐवजी जिवंत मुलगी ताब्यात दिल्याचं उघड झालं. नातेवाईकांनीही आश्चर्य व्यक्त केले. तेथील कर्मचार्‍यांनी मुलीला ताब्यात घेऊना प्री मॅच्युअर बेबी युनिटमध्ये दाखल केले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 16, 2016 08:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close