S M L

मुंबई मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद, हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी मुलींनी मारली बाजी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 17, 2016 12:32 PM IST

मुंबई मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद, हाफ मॅरेथॉनमध्ये मराठी मुलींनी मारली बाजी

मुंबई – 17 जानेवारी : 'रन मुंबई रन' असं म्हणत स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनला बोचर्‍या थंडीत आज सकाळी सुरुवात झाली. सलग 13 वर्षांपासून सुरू असलेल्या या मॅरेथॉनमध्ये मुंबई- महाराष्ट्रासह देश-विदेशातील धावपटू सहभागी झाले होते. तर स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटीही रस्त्यांवर उतरले होते. राज्यपाल विद्यासागर राव, मंत्री सुभाष देसाई, भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह कॅटरिना कैफ, जॉन अब्राहम अनेक सेलिब्रिटी उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. दरम्यान, मुख्य मॅरेथॉन स्पर्धा नितेंद्रसिंग रावतने जिंकली आहे. भारतीय गटातही तो विजेता ठरला आहे. ललिता बाबरने रौप्यपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय गटात गिगियन किपकेटर अव्वल ठरला आहे.

मुंबई मॅरेथॉनमधल्या 21 किलोमीटर्स अंतराच्या शर्यतीला 5 वाजून 40 मिनिटांनी वरळी डेअरी इथून सुरुवात झाली. तर छत्रपती शिवाजी टर्मिनस इथून मुख्य मॅरेथॉनमधल्या विविध गटाच्या शर्यतींना सुरुवात झाली. हाफ मॅरेथॉनवर दोन मराठमोळ्या धावपटूंनी आपलं नाव कोरलं. महिलांच्या गटात मोनिका राऊत अव्वल ठरली. मनिषा साळुंखेने दुसरा तर मोनिका आथरेने तिसरा क्रमांक पटकावला. पुरुषांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये दिपक कुमारने विजय नोंदवला. त्याने 1 तास 6 मिनिटे आणि एका सेकंदात ही स्पर्धा जिंकली.

मुंबई मॅरेथॉनमधल्या भारतीय महिलांच्या गटात महाराष्ट्राच्या ललिता बाबरला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. 42.195 किलोमीटर्स अंतराच्या या शर्यतीत भारतीय महिलांच्या गटात ललिता सलग दुसर्‍या वषच् दुसरी आली. याआधी 2012, 2013 आणि 2014 साली ललितानं या शर्यतीत विजेतेपदाची हॅटट्रिक साधली होती. यंदा या गटात सुधा सिंग पहिली, तर ओ. पी. जैशा तिसरी आली. भारतीय पुरुषांच्या गटात नित्येंद्र सिंगनं सुवर्णपदक पटकावलं.

हाफ मॅरेथॉन विजेते (महिला)

प्रथम- मोनिका राऊत,

द्वितीय- मनिषा साळुंखे,

तृतीय- मोनिका आथरे

मुख्य मॅरेथॉन न आंतरराष्ट्रीय गट - (पुरुष)

गिगिअन किपकेटर

मुख्य मॅरेथॉन न भारतीय गट - (पुरुष)

नितेंद्र सिंग रावत

मुख्य मॅरेथॉन भारतीय गट (महिला)

प्रथम- सुधा सिंह,

द्वितीय- ललिता बाबर,

तृतीय- ओ. पी. जैशा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2016 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close