S M L

ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय, 3-0 ने जिंकली मालिका

Samruddha Bhambure | Updated On: Jan 17, 2016 08:30 PM IST

ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय, 3-0 ने जिंकली मालिका

17 जानेवारी : ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज खेळीनंतर भारतानं दिलेलं 277 धावांचं सोपं आव्हान पार करत मेलबर्नच्या एमसीजी ग्राऊंडवर झालेल्या अटितटीच्या लढतीत 48.5 शटकांत 3 गडी राखून कांगारूंनी पाच सामन्यांची वन डे मालिका खिशात घातली. भारतीय गोलंदाजांना कांगारूंना रोखता न आल्यानं मालिकेतील सलग तिसर्‍या सामन्यात पराभव झाल्यानं टीम इंडियाचं मालिकेतील आव्हान अखेर संपुष्टात आलं.

300 हून अधिक धावा उभारूनही पहिले दोन सामने गमावलेल्या भारतानं आजच्या सामन्यात मात्र 295 धावांचा पल्ला गाठला. ऑस्ट्रेलियानं सात विकेट गमावून सात चेंडू राखत 296 धावांचं लक्ष पार केलं आणि सामन्यासह मालिकेवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. खरं तर भारतानं कांगारूंची सहा बाद 215 अशी अवस्था केली होती. मात्र मॅक्सवेलनं 83 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि तीन षटकारांसह 96 धावा फटकावल्या आणि कांगारूंना विजय मिळवून दिला.

दरम्यान, या पराभवामुळं आपण निराश असल्याचं धोणी या सामन्यानंतर बोलताना म्हणाला, 'आम्ही चांगली फलंदाजी केली, परंतु आमचे गोलंदाज नवखे आहेत. या कारणामुळं आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला.'

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 17, 2016 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close