S M L

शेंदूर लेपनासाठी सिद्धीविनायकाचं दर्शन 5 दिवस बंद

Samruddha Bhambure | Updated On: Jan 18, 2016 02:45 PM IST

शेंदूर लेपनासाठी सिद्धीविनायकाचं दर्शन 5 दिवस बंद

मुंबई – 18 जानेवारी : मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेलं सिद्धीविनायक मंदिरात येत्या 20 ते 24 जानेवारीपर्यंत भाविकांना गणपतीचं दर्शन घेता येणार नाही. श्रींच्या मूर्तीला या पाच दिवसांत शेंदूर लेपनाचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना सिद्धीविनायकचं दर्शन घेता येणार नाही.

मात्र, याच कालावधीत भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून श्रींच्या प्रतिमूर्तीचं दर्शन घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेंदूर लेपनाचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी 25 जानेवारी रोजी गणेशमूर्तीचं पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्‍यातून दर्शन घेता येईल, मंदिर न्यासाचे उपकार्यकारी अधिकारी रवी जाधव यांनी ही माहिती दिली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2016 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close