S M L

IPLस्पॉट फिक्सिंग: अजित चंडेलावर आजन्म, तर हिकेन शहावर 5 वर्षांची बंदी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 18, 2016 09:28 PM IST

IPLस्पॉट फिक्सिंग: अजित चंडेलावर आजन्म, तर हिकेन शहावर 5 वर्षांची बंदी

पिंपरी- 18 जानेवारी :  आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी ठरलेल्या अजित चंडेला याच्यावर आजीवन, तर हिकेन शहा याच्यावर 5 वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने सोमवारी याबाबतचा अंतिम निर्णय दिला.

दोघांनाही त्यांच्यावरील आरोपांविरोधात लेखी प्रत्युत्तर देण्यासाठी 4 जानेवारीपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर ज्योतिरादित्य सिंधिया आणि निरंजन शाह या तिघांचा समावेश असलेल्या शिस्तपालन समितीच्या आज झालेल्या बैठकीत चंडेला आणि शहाबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. यात अजितवर आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली, तर हिकेन शहावर पाच वर्षांच्या बंदीचा निर्णय घेण्यात आला. अजित चंडेलानेच बुकींशी ओळख करून दिल्याची कबुली हरमित सिंगने दिली होती.

चंडेलाला 2013 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना संघसहकारी श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांच्या साथीने स्पॉटफिक्सिंग केल्याचा या तिघांवर आरोप होता. श्रीशांत आणि अंकित या दोघांना बीसीसीआयने यापूर्वीच आजीवन बंदीची शिक्षा ठोठावली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2016 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close