S M L

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब दानवे

Samruddha Bhambure | Updated On: Jan 18, 2016 06:26 PM IST

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब दानवे

मुंबई - 18 जानेवारी : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. तत्पुर्वी रात्री उशिरा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची दानवे यांनी  नागपूरात त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाल्याने रावसाहेब दानवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले होते. पण, प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवेंना फक्त 10 महिन्याचा कालावधी मिळाला होता. आता त्यांना 3 वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2016 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close