S M L

चुकीच्या प्रिंटिंगमुळे सहा कोटींच्या नोटा बँकांकडून परत

Sachin Salve | Updated On: Jan 19, 2016 08:37 PM IST

चुकीच्या प्रिंटिंगमुळे सहा कोटींच्या नोटा बँकांकडून परत

नाशिक - 19 जानेवारी : पैसा किती बहुमुल्य असतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण, एका चुकीमुळे तब्बल 6 कोटींची रक्कम परत मागवण्यात आलीये. या प्रकरणी 3 कामगारांना निलंबित करण्यात आलंय.

घडलेली हकीकत अशी की, नाशिकच्या करन्सी आणि नोट प्रेसमध्ये 1000 हजारांच्या नोटांमध्ये सदोष छपाई झाल्याची बाब समोर आली. या नोटांच्या तार आणि वॉटर मार्कमध्ये चूक झाल्याचं समोर आलंय.  धक्कादायक म्हणजे या नोटा चलनातही आल्या होत्या. वेगवेगळ्या बँकामधून नोटांमध्ये चूक झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर आरबीआयने एक समिती स्थापन करून चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आला. आरबीआयने सर्व नोटा परत मागवून घेतल्यात. या प्रकरणी प्रिटिंग विभागातील अधिकारी आणि कामगारांवर ठपका ठेवण्यात आला आहे. हौशंगबाद येथील कागद कारखान्यातील व्यवस्थापकांची बदली करण्यात आली असून आणखी दोन व्यवस्थापकीय दर्जाच्या दोन अधिकारांना निलंबित करण्यात आलंय. तसंच 3 कामगारांवर निलंबनाची कुऱ्हाड पडलीये. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कामगारांवर का कारवाई करण्यात आलीये. या कारवाईविरोधात कामगार आक्रमक झाले आहेत. सुरक्षा अधिका-यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला आहे. इतकी गंभीर चूक झाली कशी अशीही चर्चा होतेय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 19, 2016 07:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close