S M L

बाचा खान विद्यापीठावर दहशतवादी हल्ल्यात 30 जण ठार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 20, 2016 04:26 PM IST

बाचा खान विद्यापीठावर दहशतवादी हल्ल्यात 30 जण ठार

पाकिस्तान - 20 जानेवारी : पाकिस्तान पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरलंय. आज सकाळी पाकिस्तानातल्या पेशावर इथल्या बाचा खान विद्यापीठामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. ज्यात 30 जणांचा मृत्यू झालाय. या परिसरातील विद्यार्थी आणि स्टाफची सुटका करण्यात आली आणि हा परिसर रिकामा करण्यात आलाय. दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांदरम्यान झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन दहशतवादी मोठा शस्त्रसाठा घेऊन बुधवारी सकाळी विद्यापीठाच्या आवारात घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विद्यापीठाच्या आवारातच अंदाधुंद फायरींग करायला सुरूवात केली. या फायरींगमध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पाकिस्तानचे सैन्यदल घटनास्थळी दाखल झाली असून, संपूर्ण परिसर त्यांनी ताब्यात घेतला आहे. सकाळी धुक्याच्या वातावरणाचा फायदा घेत हे दहशतवादी घुसल्याचं समजतंय. या विद्यापीठाला काही काळापासून धमक्या येत होत्या अशीही माहिती समोर येत आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या पेशावरमध्येच डिसेंबर 2014मध्ये एका सैनिकी शाळेवर अशाच पद्धतीने दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 100 पेक्षा जास्त निरपराध चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2016 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close