S M L

शिवसेनेच्या मीडिया सेलमधील 18 कर्मचार्‍यांचे राजीनामे

2 फेब्रुवारी शिवसेनेच्या मीडिया सेलमधील 18 कर्मचार्‍यांनी राजीनामे दिले आहेत. शिवसेना भवनात असलेल्या मीडिया सेलमध्ये हे कर्मचारी काम करतात. वरिष्ठांकडून त्रास दिला जात असल्याने त्यांनी राजीनामे दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या प्रचाराची प्रसिद्धी करण्याची जबाबदारी या मीडिया सेलवर होती. या सेलची जबाबदारी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले शैलेश पाटील यांच्यावर सोपवण्यात आली होती. प्रचारादरम्यान या सेलच्या माध्यमातून शैलेश पाटील यांचा पक्षात प्रभाव वाढला होता. ही बाबही शिवसेनेच्या अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना खटकली होती.त्यामुळे शिवसेनेच्या पराभवाला या मीडिया सेलची चुकीची प्रचारपद्धत कारणीभूत असल्याची चर्चा सेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये रंगली होती.दरम्यान या कर्मचार्‍यांनी मातोश्रीवर जाऊन रश्मी ठाकरे यांची भेट घेतली आणि आपल्या अडचणी त्यांच्या कानावर घातल्या. येत्या दोन दिवसात आपण योग्य ती कारवाई करू असे आश्वासन रश्मी ठाकरे यांनी या कर्मचार्‍यांना दिल्याची माहिती मिळत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2010 12:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2010 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close