S M L

मुंबईसह राज्यात हुडहुडी, नाशकात नीचांकी नोंद

Samruddha Bhambure | Updated On: Jan 21, 2016 01:33 PM IST

मुंबईसह राज्यात हुडहुडी, नाशकात नीचांकी नोंद

21 जानेवारी : उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव राज्यभर जाणवत असून मुंबईतही गारठा कमालीचा वाढत आहे.  विशेषत: नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा पारा कमालीचा खालावला आहे. बुधवारी नाशिकमध्ये सर्वात कमी म्हणजे 5.8 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेलं तर मुंबईतील तापमान 12.6 अंश से. पर्यंत खाली गेलंय. पुढचा आठवडाभर थंडी अशीच कायम राहणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे.

राज्यभरात कडाक्याची थंडी पडली असून पर्यटनाला चांगलंच उधाण आलं आहे. नाशिक, परभणी, यवतमाळ, सातारा या ठिकाणी थंडीमुळे हुडहुडाट आहे. धुळ्यात किमान तापमान 6.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे.

दुसरीकडे मुंबई-पुण्यातही आज थंडीचा जोर कायम आहे. मुंबईत थंड वाऱ्याची लाट आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईकर मात्र या गुलाबी थंडीची मजा लुटताना दिसत आहेत. डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरुवातीला थंडी जणू काही गायबच झाली होती. दुपारचे कडक ऊन आणि पहाटे आणि संध्याकाळी गार वारे अशी विचित्र परिस्थिती मुबंईत होती. परंतु बुधवारी दुपारीही बोचरे वारे मुंबईत वाहत होते. बुधवारी झालेल्या तापमानाची नोंद म्हणजे या हंगामातील सर्वात निचांकी तापमान आहे. त्यामुळे ठिकठिकाणी स्वेटर, कानटोप्या घातलेले मुंबईकर दिसत होते.

इतर जिल्ह्यांचे तापमान

निफाड – 6 अंश सेल्सिअस

पुणे – 8.2 अंश सेल्सिअस

नागपूर – 13.4 अंश सेल्सिअस

मुंबई – 12.6 अंश सेल्सिअस

नाशिक – 5.8 अंश सेल्सिअस

औरंगाबाद – 10.6 अंश सेल्सिअस

चंद्रपूर – 16.4 अंश सेल्सिअस

रत्नागिरी -15.1 अंश सेल्सिअस

सातारा – 11 अंश सेल्सिअस

सांगली – 15.4  अंश सेल्सिअस

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2016 10:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close