S M L

कर्ज न फेडल्याने शेतक-याला पाजलं विष, 2 सावकारांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Jan 21, 2016 01:52 PM IST

कर्ज न फेडल्याने शेतक-याला पाजलं विष, 2 सावकारांना अटक

21 जानेवारी : सावकाराकडून मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज न फेडल्याच्या कारणावरून, सावकारांनी शेतक-याला विष पाजलं आहे. शेतक-याची प्रकृती गंभीर असून, सावकारांना अटक करण्यात आलं आहे.

बीड जिह्यातील मानेवाडीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. भरत माने असं पीडित शेतक-याचे नाव आहे. जिल्हय़ातीलच एका खासगी रूग्णालयात माने यांच्यावर उपचार सुरू आहे. माने यांनी मुलीच्या लग्नासाठी पाचंग्री इथल्या सावकार अप्पा मुंडेकडून 1 लाख रूपयाचे कर्ज घेतलं होतं. तारण म्हणून त्यांनी 3 एकर शेती सावकारांकडे दिली होती. पाच वर्षांत मानेंनी सावकाराला 1 लाख रूपयाच्या बदल्यात 8 लाख रूपये व्याज म्हणून फेडले. पण एवढय़ावरही सावकाराचे मन तृप्त न झाल्याने त्यांची संपूर्ण जमीन हडपली.

त्यानंतर सावकार अप्पा मुंढे आणि त्याचे सहका-यांनी मिळून माने यांना विष पाजलं, असा आरोप माने यांचा मुलगा प्रवीण याने केला आहे. दरम्यान, सावकार अप्पा मुंढे आणि सूर्यभान मुंढे यांना पोलिसांनी अटक केली आहे. सावकारी कायद्याच्या अंतर्गत दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2016 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close