S M L

शेतक-यांवर होणा-या अन्यायाविरोधात बळीराजाची 'पुरस्कार वापसी'

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2016 04:31 PM IST

शेतक-यांवर होणा-या अन्यायाविरोधात बळीराजाची 'पुरस्कार वापसी'

नागपूर - 21 जानेवारी : देशात वाढत्या असहिष्णुतेविरोधात साहित्यिकांनी 'पुरस्कार वापसी' केली होती. आता राज्यात शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात नागपुरातल्या 2 शेतकऱ्यांनी त्यांना दिलेले शेतीनिष्ठ शेतकरी आणि कृषी भूषण पुरस्कार परत  करणार आसल्याचं जाहीर केलंय. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ त्यांनी हा निर्णय घेतलाय.

नागपुरातल्या चिमूर तालुक्यात राहणारे मोरेश्वर झाडे आणि हेमंत शेंदरे हे शेतकरी आज राज्यपालांना शेतिनिष्ठ कृषिभूषण पुरस्कार परत करणार आहेत. तोट्यात आलेली शेती, शेतमालाला भाव नाही, कर्जबाजारीपणा आणि सरकारचे शेतकऱ्यांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे  'पुरस्कार वापसी' चा निर्णय  या शेतकऱ्यांनी घेतलाय.

चंद्रपूरचे मोरेश्वर झाडे आणि  हेमंत शेंदरे यांनी पुरस्कार वापस करण्याचा निर्णय घेतलाय. झाडे यांनी चांगल्या प्रकारे शेती करून भरपूर उत्पादन मिळवलं होतं. म्हणून त्यांना 1988 मध्ये राज्यपालांच्या हस्ते शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच 2002 मध्ये कृषिभूषण पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. झाडे यांच्याकडे एकूण 15 एकर शेती आहे. कापूस, सोयाबीन, धान, संत्रा ही पिकं ते घेतायत. परंतु, शेती तोट्यात जात असल्याने 10 लाखांच्या वर कर्ज झालंय. त्यामुळे त्यांनी शेती विकायला काढली आहे. एवढंच नाहीतर घरही विकणार आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2016 04:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close