S M L

'त्या' 22 हजार 500 कोटींच्या नोटांपैकी अवघ्या 179 नोटा सदोष

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2016 11:13 PM IST

'त्या' 22 हजार 500 कोटींच्या नोटांपैकी अवघ्या 179 नोटा सदोष

नाशिक - 21 जानेवारी : देशाला हादरवून सोडणार्‍या सदोष नोटांच्या प्रकरणात नवा खुलासा झालाय. नाशिकच्या नोट प्रेसमध्ये नोटा चुकीच्या छापलेल्या नाहीत. तर जाळलेले कागद सदोष नोटा नसून फक्त सदोष छपाई पेपरमुळे या नोटा नष्ट केल्या गेल्या. 'डे लारु' या ब्रिटिश कंपनीचा तो सदोष कागद होता. नाशिक प्रेसने छापलेल्या 22 हजार 500 कोटींच्या नोटांपैकी अवघ्या 179 नोटा सदोष छापल्या गेल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वीच संपूर्ण देशाला चलन पुरवणार्‍या नाशिकच्या नोट प्रेसमध्ये एक हजार रुपयांच्या नोटांची सदोष छपाई झाल्याची घटना उघडकीस आली होती. एक हजाराच्या 50 कोटी नोटांपैकी 30 कोटी नोटांची छपाई झाल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे 30 हजार कोटींच्या नोटा जाळण्यात आल्या होत्या. या कागदांची नोट बनवण्याची प्रक्रिया करणार्‍या नाशिकच्या नोट प्रेसच्या कंट्रोल विभागातील तीन कामगारांना सोमवारी निलंबित करण्यात आलं आहे. तर इतर चार अधिकार्‍यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कामगार युनियननं या प्रकरणी आंदोलन केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. अधिकार्‍यांना पाठिशी घालून कामगारांना बळीचा बकरा केल्याचा आरोप युनियननं केला आहे. ब्रिटनची कंपनीचा 304 मेट्रिक टन चॉपिंग बंडल सदोष निघाले होते. सन 2010 पासून हा सदोष कागद आलेला होता. चौकशी पूर्ण झाल्यावर हा कागद नियमानुसार नष्ट केला गेला. 7-8 महिन्यापासून कागदाचे रिम नष्ट करायचं काम सुरू होतं, असं स्पष्टीकरण गोडसे यांनी दिलं. 22 हजार 500 कोटींच्या नोटापैकी फक्त काही नोटांच्या छपाईमध्येच चूक झाल्याचं नोट प्रेसच्या कामगार संघटनेनं मान्य केलंय.

नवा खुलासा

- नाशिकच्या नोट प्रेसमध्ये जाळण्यात आलेले रिम हे सदोष नोटांचे नसून सदोष नोट छपाई कागदाचे

- बाजारात असलेल्या एक हजारांच्या सर्व नोटा सुरक्षित

- नोट प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांचा दावा

- 22 हजार 500 कोटींच्या नोटांत प्रिंटिंगच्या चुकीची शक्यता

- यातील 179 नोटा ताब्यात -एकही नोट जाळली गेली नाही

- साधारणपणे 500 रुपयांच्या प्रिंटिंगमध्ये चूक

- इंडियन सिक्युरीटी प्रसेच्या कामगार संघटनेचा खुलासा

- इंडियन सिक्युरिटी प्रेसच्या कामगारांचा खुलासा

- 1000 रुपयांच्या 500 नोटात चूक झाली असल्याचा खुलासा

- रिझर्व्ह बँकेनं या नोटा परत मागवल्या

- वितरीत नोटा ग्राहकांना बदलून देण्याचे आदेश

- साधारणपणे 500 नोटांत प्रिटींगमध्ये चूक

- बाजारात असलेल्या एक हजाराच्या नोटा सुरक्षित

- यातील एकही नोट जाळली गेली नसल्याचा खुलासा

- करन्सी प्रेसच्या कामगार संघटनेनं केला खुलासा

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2016 09:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close