S M L

सरकारी तूरडाळ शिजतच नाही, राष्ट्रवादीचं कुकरी आंदोलन

Sachin Salve | Updated On: Jan 22, 2016 06:02 PM IST

सरकारी तूरडाळ शिजतच नाही, राष्ट्रवादीचं कुकरी आंदोलन

मुंबई - 22 जानेवारी : साधारणतः आपण कुकरी शो मनोरंजन वाहिन्यांवर नेहमीच पाहत असतो. आज मात्र चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कुकरी आंदोलन करण्यात आलंय. राज्य सरकारकडून बाजारात उपलब्ध करुन देण्यात येत असलेली 100 रुपये किलो तूर डाळ कशी शिजत नाही याचं प्रात्यक्षिक आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दाखवण्यात आले.

तूर डाळ कूकरमध्ये ठेवून 5 शिट्टया दिल्यानंतरही अखेर शिजलीच नाही. एकंदरीतच सरकारचा डाळबद्दलचा दावा खोटा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2016 06:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close