S M L

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुष्काळग्रस्त गावं दत्तक घ्यावी, कोर्टाची सरकारला सुचना

Sachin Salve | Updated On: Jan 22, 2016 08:22 PM IST

Mumbai high court22 जानेवारी : गेल्या तीन वर्षांमध्ये राज्यात एक हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारने हायकोर्टाला दिली आहे. याबाबत कोर्टाने गंभीर दखल घेतली आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेण्याची सुचना सरकारला केली आहे. त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांना गावे दत्तक घेण्यासाठी सरकारने आवाहन करावे, असंही कोर्टाने सुचवलंय.

दुष्काळामुळे राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ झाल्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेत न्यायालयाने याप्रकरणी स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळेस 2013 ते 2015 या तीन वर्षांत राज्यात एक हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. पण प्रत्यक्षात गेल्या वर्षभरातच एक हजाराहून जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचं काही सामाजिक संस्थांचं म्हणणं आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसंच आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना आधार म्हणून आतापर्यंत 14 कोटी रुपयांहून अधिकचा निधी देण्यात आला आहे, असं राज्य सरकारतर्फे कोर्टाला सांगण्यात आलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2016 07:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close