S M L

वाळू माफियांचं मोडलं कंबरडं, 10 बोटी स्फोट घडवून केल्या उद्‌ध्वस्त

Sachin Salve | Updated On: Jan 22, 2016 09:36 PM IST

वाळू माफियांचं मोडलं कंबरडं, 10 बोटी स्फोट घडवून केल्या उद्‌ध्वस्त

बारामती - 22 जानेवारी : वाळू माफियांना चाप बसवण्यासाठी आता इंदापूरमध्ये खूप मोठी कारवाई करण्यात आलीये. उजनीतल्या वाळू माफियांचं महसूल विभागानं चांगलंच कंबरडं मोडलंय. या वाळू माफियांच्या बोटी जिलेटीनने उद्‌ध्वस्त करण्यात आलंय.

इंदापूर तालुक्यात भिगवण आणि करमाळामध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत होता. या ठिकाणी बारामती प्रांतधिकारांनी छापा टाकून वाळू माफियांचा अड्डा उद्‌ध्वस्त केला. तसंच 10 बोटी जप्त करण्यात आल्या आहे. करमाळ परिसरात फ्लेमिंगोसह हजारो परदेशी पाहुणे येतात. या अवैधरितीने चालणार्‍या वाळू उपसामुळे पक्ष्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय अशी तक्रार पक्षीप्रेमींनी केली होती. त्यानंतर बारामती प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी ही धाडसी कारवाई केली. मात्र या परिसरातील मुजोर वाळू माफियांनी यांत्रिक बोटी आणि इतर साधनांनी बेसुमार चोरत वाळू उपसा सुरू केल्याने या पाहुण्यांचे अस्तित्वच धोक्यात येवू लागले होते .महसुल प्रशासनाशी अर्थपूर्ण सबंध असल्याने या मुक्या पाहुण्यांचे अस्तित्वच धोक्यात येवू लागले होते.

अखेर या सगळ्या परिस्थितीची माहिती मिळाल्यावर बारामती येथील प्रांत अधिकारी संतोष जाधव यांच्या पथकाने डाळज नंबर 1 आणि करमाळा तालुक्यातील कात्रज येथील या माफियांच्या अड्‌ड्यावर धाड टाकून पाण्यात वाळू उपसा करीत असलेल्या 10 बोटी थेट स्फोट करून उडवून दिल्या आणि पाण्यात बुडवून टाकल्या.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 22, 2016 09:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close