S M L

भूमाता ब्रिगेडच्या 400 महिला घेणार शनीचं दर्शन, शिवसेनेचा कडाडून विरोध

Sachin Salve | Updated On: Jan 23, 2016 01:44 PM IST

Shani-Shingnapur-925615528sअहमदनगर - 23 जानेवारी : येत्या 26 जानेवारीला भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या शनी शिंगणापूरमध्ये शनीच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेणार आहेत.या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी शिवसेना महिला आघाडीनेही भूमाता ब्रिगेडच्या विरोधात दंड थोपटले आहे. प्रसंगी कायदा हातात घेण्याची वेळ आली तरी चौथर्‍यावर चढू देणार नाही अशी भूमिका सेनेनं घेतलीये.

अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या शिवालय इथल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महिला कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भूमाता ब्रिगेडच्या 400 महिला शनी चौथर्‍यावर चढून दर्शन घेणार आहेत. त्याविरोधात शिवसेना महिला आघाडी जेलभरो आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

सेनेच्या महिला शनी चौथर्‍याला कडे करून उभ्या राहणार आहेत. भूमाता ब्रिगेडच्या 400 काय 4000 महिला जरी आंदोलनात सहभागी झाल्या तरी त्यांना चोप देऊ प्रसंगी कायदा हातात घेऊ अशी भूमिका सेना महिला आघाडीने घेतलीय. एवढंच नाहीतर या आंदोलनाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केलाय. त्यामुळे हा वाद आता चिघळण्याची चिन्ह आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 23, 2016 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close