S M L

अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा; 19 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Jan 24, 2016 05:25 PM IST

अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा; 19 जणांचा मृत्यू

अमेरिका – 24 जानेवारी : अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यांना हिमवादळाचा प्रचंड तडाखा बसला असून, या वादळाने आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिमवादळामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून अनेक ठिकाणी 30 इंचापर्यंत बर्फ साचला आहे.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. याबरोबरच जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, टेनिसी, मेरीलँड, व्हर्जिनिया, न्यूजर्सी, न्यूयॉर्क या राज्यांना हिमवादळाचा तडाखा बसला आहे. या सर्व राज्यांतील सुमारे 8.5 कोटी नागरिक हिमवादळामुळे प्रभावित झाले आहेत. सर्व प्रमुख शहरांतील रस्त्यांवर बर्फाचे थर दिसत असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आता हे हिमवादळ ऍटलांटिक महासागरामधून बाहेर पडतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2016 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close