S M L

मुंबईत भाजपच एक नंबरचा पक्ष - आशिष शेलार

Samruddha Bhambure | Updated On: Jan 24, 2016 07:02 PM IST

ashish shelar 24 जानेवारी : मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येतेय तसा शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काल उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केल्यानंतर आज भाजपनं शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे.

'ज्यांना कावीळ झालीय त्यांना सर्व काही पिवळं दिसतं. शिवाय मुंबईत भाजपच एक नंबरचा पक्ष असून भविष्यातही भाजपच एक नंबरचा पक्ष राहिलं, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. तर मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डात विजय मिळवण्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न आहेत, असं विश्वास खुद्द प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान भाजपनं आधी दिल्ली आणि बिहारमधलं पानिपत आठवावं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. शिवाय मुंबई पालिकेवर पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास उद्धव यांनी बोलून दाखला होता. यानंतर भाजपनं उद्धव यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 24, 2016 07:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close