S M L

सिंधुदुर्गात आढळले माकडतापाचे रुग्ण

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2016 05:43 PM IST

सिंधुदुर्गात आढळले माकडतापाचे रुग्ण

सिंधुदुर्ग- 25 जानेवारी : जिल्ह्यातील केरगावात माकडतापाचा रुग्ण आढळल्याने राज्याची आरोग्य यंत्रणा हादरली आहे. राज्य शीघ्र प्रतिसाद पथक आणि कोल्हापूरच्या हिवताप पथकाने तातडीने केर गावाचा दौरा करून गावातल्या अनेकांचे रक्तनमुने गोळा केले आहेत. विशेष म्हणजे या पथकाच्या दौर्‍यात केर गावात मृत माकड आढळल्याने ही भीती अधिकच वाढली आहे.

4 जानेवारीपासून या गावात तापाच्या साथीचे 21 रुग्ण आढळून आले. त्यात तिघांची प्रकृती खालावली होती. त्यांना गोव्याच्या बांबुळी रुग्णालयात पाठवले होते. या तिघांचे रक्तनमुने मणिपाल येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातल्या एकाच्या रक्तात CFD म्हणजेच कॅसनूर फॉरेस्ट डिसीज म्हणजेच माकडताप असल्याचे निष्पन्न झालंय. सध्या केर गावातील रुग्णाचे नमुने पुण्याच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी विभागाकडे पाठवण्यात आले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2016 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close