S M L

आता सौरऊर्जेपासून घरासाठीही करता येणार वीजनिर्मिती !

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2016 09:49 PM IST

आता सौरऊर्जेपासून घरासाठीही करता येणार वीजनिर्मिती !

solar_power333मुंबई - 25 जानेवारी : आता तुम्हाला घरीच सौर ऊर्जेवर अन्न शिजवायचे असले अथवा सौर दीवे लावायचे असेल तर तुम्ही ते लावू शकता. कारण अपारंपरिक उर्जा निर्मितीच्या एकत्रित धोरणाला राज्य सरकारनं आज महत्त्वपूर्ण मंजुरी दिली. राज्य मंत्रिमंडळच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

सौर ऊर्जेच्या जास्तीत जास्त वापराला चालना देण्यासाठी एकत्रित धोरण राज्य सरकारनं जाहीर केलंय. यामुळे आता घरावरही वीज निर्मितीसाठी सौर संच बसवता येणार आहेत. या योजनेनुसार सौर विद्युत संच उभारणे , सौरपंप, सौर वाटर हिटर, सोलर कुकिंग, बायोगॅसपासून वीजनिर्मिती करण्यासाठी मंजुरी दिली आहे. राज्याचे नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून विकेंदि्रत पारेषण विरहित ऊर्जा निर्मितीचे एकत्रित धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आगामी पाच वर्षांसाठी 2 हजार 682 कोटी रूपयांचा निधी खर्च होणार आहे.

राज्यातील ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेता नवीन अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा विकास करण्यासाठी राज्यातील मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या स्रोतांचा वापर करून राज्यात पारेषणविरहित ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करण्यासाठी व त्याच्या वापरास चालना देण्यासाठी एकत्रित धोरण राज्य शासनाने जाहीर केले आहे.

इमारतीचे छत आणि जमिनीवर स्थापित करता येऊ शकणारे पारेषणविरहित एकूण 200 मेगावॅट वीज निर्मिती करू शकणारे सौरविद्युत संच बसविण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत शासकीय इमारतीवर 100 टक्के अनुदानावर 1 ते 50 किलोवॅट क्षमतेच्या संचाच्या माध्यमातून दरवर्षी 30 मेगावॅट याप्रमाणे पुढील पाच वर्षांत एकूण 150 मेगावॅट विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे, तर इतर खाजगी संस्थांच्या इमारतीवर 20 टक्के अनुदानाच्या योजनेतून 5 ते 20 किलोवॅट इतक्या क्षमतेच्या संचाच्या माध्यमातून दरवर्षी 10 मेगावॅट याप्रमाणे पुढील पाच वर्षांत एकूण 50 मेगावॅट इतक्या विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. यासाठी पुढील पाच वर्षात शासकीय व खासगी अशा दोन्ही प्रकल्पासाठी एकूण दहा हजार इमारतीवरील प्रकल्पांसाठी 1600 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2016 08:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close