S M L

'नाम'ने पैठणमधील 3 गावं घेतली दत्तक

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2016 09:07 PM IST

'नाम'ने पैठणमधील 3 गावं घेतली दत्तक

औरंगाबाद - 25 जानेवारी : आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनं आणखी तीन गावं दत्तक घेतली आहे. पैठण तालुक्यातील ही तीन गावं आहेत.

अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या कार्यक्रमानिमित्त पैठण तालुक्यातील कुतूबखेड्यात आले होते. त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधून मदतीची हमी दिली. मात्र कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आत्महत्या करू नका असा सल्लाही शेतकर्‍यांना दिला. नाम ही आमची नसून मदतदात्यांची आहे आणि येणार्‍या काळात दुष्काळग्रस्त भागातील मुलामुलींचं सामूहिक लग्न सोहळा करणार असल्याची घोषणाही मकरंद अनासपुरे यांनी केली.

तसंच तरुणांनी हुंडा नको अशी भूमिका घेतली पाहिजे. ज्या तरुणांना हुंडा नको अशा तरुणांनी नामशी संपर्क साधावा त्या तरुणांचा विवाह लावून देण्यात येईल असं आवाहनही अनासपुरे यांनी केलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2016 09:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close