S M L

शरद जोशींच्या मुलीनं सविनय नाकारला पद्म पुरस्कार

Sachin Salve | Updated On: Jan 25, 2016 09:27 PM IST

sharad_joshi_2 25 जानेवारी : 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर आज पद्म पुरस्काराची घोषणा झाली. शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी यांना मरणोत्तर पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या कुंटुबियांकडे विचारणा झाली. मात्र त्यांच्या मुलीन हा पुरस्कार नाकारलाय.

पुरस्कारापेक्षा माझ्या वडिलाचं काम खूप मोठ आहे. त्यामुळे हा पुरस्कार सविनय नाकारल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. शरद जोशींचे सहकारी अनंत देशपांडे, सुरेशचंद्र म्हात्रे यांनी सुद्धा पुरस्कार नाकारण्याच्या या भूमिकेच समर्थन केलंय. सरकार ही एक समस्या आहे असं म्हणणारे शरद जोशी कधीच सरकारी पुरस्काराचे लोभी नव्हते, यापुर्वीही त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. त्यांच्या कामाला साजेसा हा पुरस्कार नसल्याचं सुरेशचंद्र म्हात्रे यांनी म्हटलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 25, 2016 09:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close