S M L

माझा जन्म इथला आहे, मरणारही इथेच ; आमिरने टाकला असहिष्णुतेवर पडदा

Sachin Salve | Updated On: Jan 26, 2016 09:15 AM IST

माझा जन्म इथला आहे, मरणारही इथेच ; आमिरने टाकला असहिष्णुतेवर पडदा

मुंबई - 26 जानेवारी : या देशात माझा जन्म झालाय आणि मरणारही याच देशात असं म्हणत अभिनेता आमिर खानने असहिष्णु वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

असहिष्णुतेच्या मुद्यावर देश सोडण्याचं वक्तव्य केल्यामुळे आमिर खान वादाचा भोवर्‍यात सापडला होता. 2006 साली सुपरहिट रंग दे बसंती सिनेमाला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमिर खानने आपल्याला भारत हा असहिष्णु आहे आणि मला देश सोडून जायचं असं म्हणायचं नव्हतं अशी बाजू मांडली. मी समजू शकतो की माझ्या विधानामुळे काही लोकांची मन दुखावली गेली. पण माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. यासाठी मीडियाही जबाबदार आहे. माझा इथं जन्म झालाय आणि मरणंही इथंच येईल असं आमिरने स्पष्ट केलं. आपला देश विविधतेनं नटलेला आहे. दुसर्‍या कुठल्याही देशात अशी विविधता नाहीये. मी जेव्हा परदेशात जातो तेव्हा 2 आठवड्यांपेक्षा तिथे राहु शकत नाही असंही आमिर म्हणाला.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2016 09:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close