S M L

परभणीत ग्रामसभेत गोळीबार, 2 जणं जखमी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 27, 2016 08:55 AM IST

crime

परभणीत - 26 जानेवारी : परभणीत ग्रामसभा भरली असतानाच गोळीबाराची थरारक घटना घडली. या गोळीबारात दोघं जण जखमी झालं आहेत.

26 जानेवारीनिमित्त परभणी तालुक्यातील साबळे भोगाव इथं ग्रामसभा भरली होती. यावेळी मनेरगाच्या कामावरुन वादावादी सुरु झाली. मनरेगाच्या कामाबद्दल विचारणा केल्यानं, उपसरपंच अशामती राऊत यांचा पती मनोज राऊत याने हवेत 3 गोळया झाडल्या. राऊत यांनी झाडलेली गोळी कोणाला लागली नाही, मात्र गोळी चाटून गेल्याने दोघे जण जखमी झाले. या गोळीबारानंतर गावात तणावाचं वातावरण आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2016 04:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close