S M L

जय हो! भारताचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय

Samruddha Bhambure | Updated On: Jan 26, 2016 07:52 PM IST

जय हो! भारताचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय

 

अॅडलेड - 26 जानेवारी : पहिल्या टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलिया हरवून टीम इंडियाने आज प्रजासत्ताकदिनी अॅडलेडमध्ये विजयी तिरंगा फडकवला आहे. कोहलीच्या धडाकेबाज 90*, रैनाच्या संयमी 41 धावा आणि मग भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक कामगिरीमुळे टीम इंडियाने 37 धावांनी विजयाला गवसणी घातली.

या विजयासह टीम इंडियाने तीन टी ट्वेण्टी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या धडाकेबाज शतकी भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 ओव्हरमध्ये 151 धावांवर ऑलआउट झाला. अश्विन, जडेजा, आणि पंड्याने दोन-दोन विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ऍरॉन फिंचने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये युवराजसिंग, सुरेश रैना या वरिष्ठ खेळाडूंना पुन्हा संधी देण्यात आली तर ऑल राऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याला पदार्पणाची संधी देण्यात आली होती. तर ऑस्ट्रेलिया टीममध्येही शेन वॉट्सन, शॉन टेट या खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2016 07:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close