S M L

शनिशिंगणापूरचा प्रश्न चर्चेने सोडवा, स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचे आदेश

Samruddha Bhambure | Updated On: Jan 26, 2016 10:23 PM IST

345508-devendra-fadnavis-farmer

मुंबई - 26 जानेवारी : ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही. मंदिर प्रशासनाने पुढाकार घेवून चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्न सोडवले पाहिजेत असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

पुण्यातील भुमाता ब्रिगेडकडून आज शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर जाण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी गावकर्‍यांच्या विरोधात जायचं टाळलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांनी या वादावर आपलं मौन सोडत, स्पष्टपणे महिलांची बाजू घेतलीये.

भारतीय परंपरेत आणि हिंदू धर्मात स्त्रियांना उपासनेचे स्वातंत्र्य नेहमीच राहिले आहे. प्रथा परंपरांमध्ये कालसापेक्ष बदल हीच आमची संस्कृती आहे. ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही. मंदिर प्रशासनाने पुढाकार घेऊन चर्चेच्या माध्यमातून असे प्रश्न सोडवले पाहिजेत. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना सूचना दिल्या आहेत की संघर्ष टाळून संवाद प्रस्थापित करावा. समाजातील अग्रजांनी त्यामध्ये पुढाकार घ्यावा, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तर महाराष्ट्र सरकार शनी शिंगणापूर मंदिर अधिकारी आणि महिला कार्यकर्ते यांच्याशी बोलणं सुरू आहे. लवकरच यावर तोडगा निघेल असं राज्यमंत्री राम शिंदे म्हणाले.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 26, 2016 10:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close