S M L

मरिन ड्राईव्हला पुन्हा मिळणार सोनेरी झळाळी

Samruddha Bhambure | Updated On: Jan 27, 2016 03:52 PM IST

मरिन ड्राईव्हला पुन्हा मिळणार सोनेरी झळाळी

मुंबई – 27 जानेवारी : मरीन ड्राईव्ह क्वीन्स नेकलेसची सोनेरी झळाळी अखेर आजपासून परतण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या इशार्‍यानंतर पालिकेने पुन्हा पिवळे LED दिवे बसविण्याचं काम सुरू केलं आहे.

कोर्टाच्या आदेशानंतर मरीन ड्राईव्हवर पुन्हा पिवळे दिवे बसविण्यासाठी शिवसेनेने महापालिका आयुक्तांना 26 जानेवारीपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. शिवसेनेने दिलेल्या इशार्‍यानंतर पालिकेने अखेर LED दिवे बदलण्यास सुरुवात केली असून 250 दिवे बदलण्यात आले आहेत.

दरम्यान, नरिमन पॉईंट ते पोलीस जिमखान्यापर्यंत पिवळे LED दिवे बसविण्यात आले असून. उर्वरित, पिवळे दिवे आज रात्री 12 वाजल्यापासून बसविण्यात येणार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2016 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close